जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र हौशी स्क्वॅश असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ रवाना झाला आहे.पुणे येथे ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान सदर स्पर्धा पुणे येथे होत आहेत.विविध सहा गटात सामने खेळविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा संघ पुढीलप्रमाणे- ११ वर्ष वयोगट- रणवीर खेडकर, सिध्दांत शर्मा, १३ वर्ष वयोगट – उत्कर्ष वाघ, हेमांशू जावळे,गुरुदीप पाटील,१५ वर्ष वयोगट- दक्षित महाजन, सौम्य जैस्वाल, प्रथमेश महाजन,
मुली – आर्या देशपांडे, ईशा देशपांडे, पालवी मांडे,अनुष्का वाणी,१७ वर्ष वयोगट – प्रतिक राजपूत, सारंग वाणी, विवेक कोल्हे, खुश फालक,प्रशिक्षक प्रा. प्रवीण कोल्हे संघ व्यवस्थापक अमोल गोमटे.
स्पर्धेतील विजयासाठी खेळाडूंना के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल चौधरी, सचिव प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा.डॉ.रणजित पाटील,प्रा. डॉ.निलेश जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.