साईमत जळगाव प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी – जळगाव महानगरतर्फे प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजात समता, सेवा आणि प्रबोधनाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याच अनुषंगाने संत चोखामेळा बोर्डिंग येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली तसेच अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच गटनेते प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सेवा व समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, प्रबोधन सप्ताहाचे जिल्हा संयोजक आशिष सपकाळे, सहसंयोजक ज्योती निंबोरे, मनोज सोनवणे, दीपक परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. नितू ताई परदेशी, मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, नगरसेवक अरविंद देशमुख, पंकज जैन, शुभांगी बिऱ्हाडे, संगीता पाटील, तारा पटेल, पवन खंबायते, सुनील वाणी, दीपक बाविस्कर, सचिन कोळी, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, समाजसेवक अॅड. आनंद कोचुरे, चेतन ननवरे, सुनील जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
