अशोक जैन यांना अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

0
20

जळगाव : प्रतिनिधी

श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. येथील जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी आज(मंगळवारी) हे आमंत्रण अशोक जैन सन्मानपूर्वक प्रदान केले.

निमंत्रण आनंददायी व भूषणावह
“श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. श्रीराम मंदिर निधी जळगाव जिल्हा समर्पण समितीचा कार्याध्यक्ष नात्याने पवित्र अशा या धार्मिक कार्यात माझा सहभाग होताच. कान्हदेशातली श्रद्धाशील भक्तांचे अंत:करण पुलकीत करणारी बाब म्हणजे प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श जळगावच्या भूमिलाही झाला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.सविनय अधोरेखित करतो, जळगाव जिल्ह्यातील ५० लाख श्रीराम भक्तांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळते आहे हीसुद्धा भूषणावह बाब आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here