Instructions for providing services : सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना

0
26

सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) –

जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले.

सेवा हक्क पंधरवडानिमित्ताने महावितरणकडून विविध सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण पोर्टल सुरू केले आहे. यातून प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केले.

बैठकीत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्यासह विविध मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते. राज्य शासनाच्या सेवा हक्क कायदयात महावितरण कंपनीच्या काही सेवांचा समावेश करण्यात आला आहे.या सेवा वीज ग्राहकांना विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक जगदाळे यांनी केले.

यावेळी अधीक्षक अभियंता निलकमल चौधरी, कैलास बर्वे, मोहन काळोखे, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) योगेश खैरनार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) हवीषा जगताप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here