रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला इंद्रजीत सावंत यांचेही समर्थन

0
17

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला इंद्रजीत सावंत यांचेही समर्थन

कोल्हापूर (न्यूज नेटवर्क)-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीजवळच्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती कुठून झाली यावरही त्यांनी भाष्य केलं. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं.

माजी खासदार संभाजीराजे यांनी हा समाधीचा मुद्दा उपस्थित करत ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वाघा कुत्र्याची ही समाधी हटविण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक कपोलकल्पित आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचं स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजां कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली आहे, ती योग्यच असल्याचेही इंद्रजीत सावंत यांनी म्हटले.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असंही आपल्या पत्रात म्हटलं आहे. या आधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता. पण प्रशासनाने तो पुन्हा बसवला. त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षण आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here