anti-ship missiles : भारतीय नौदलाकडून जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

0
9

भारतीय नौदलाकडून जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (न्यूज नेटवर्क)-

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने अरबी समुद्रात तैनात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ही जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे.

भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी आणि क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागली. भारतीय नौदल सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी कधीही, कुठेही, कसेही, लढाईसाठी सज्ज आहे.या सरावाचे उद्दिष्ट नौदलाची लढाऊ तयारी आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची क्षमता दाखवणे होते. या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात आहेत.

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुरतने अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली होती.

अरबी समुद्रात पाकिस्तान नौदलाने नियोजित जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी ही चाचणी घेण्यात आली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि इतर हवाई लक्ष्यांविरुद्ध युद्धनौका आयएनएस सुरत प्रभावी आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफकडून कारवाई सुरू आहे. गेल्या ४८ तासांत दहशतवाद्यांचे ८ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. कुपवाडा येथे लष्करचा दहशतवादी फारूक तेदवाचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. लष्कर, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर लष्कर छापे टाकत आहे. खोऱ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी शोध मोहीम देखील राबवली जात आहे. भारतीय लष्कराने आतापर्यंत १००० हून अधिक संशयीतांना अटक केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here