government is lying : भारताने पाकचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय- प्रकाश आंबेडकर

0
12

भारताने पाकचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय- प्रकाश आंबेडकर

शिर्डी (न्यूज नेटवर्क )-

पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, 24 एप्रिलरोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. माझ्या भाषेत नरोवा कुंजरोवा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असे हे पत्र. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवलं तर सरकार कुठली कारवाई करतंय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळेझाक करू नये. फक्त पाकिस्तानी नागरिकांचा व्हीसा रद्द करून बाहेर काढण्यात येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.

सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो भाडमध्ये गेलं ते रद्द केलाय तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप ऍक्शन घ्या ना. जे समोर आलं त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला 10 वर्षे लागतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
पाकिस्तानी नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते उचकावत आहेत.

पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफने केलेलं भाषण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्याने टू नेशन थेअरी मांडली. आपल्या इंटेलिजन्स विभागाने ही माहिती देखील सरकारला दिली. मात्र, त्यावेळी सरकार झोपून राहिलं. कोणत्याही सूचना दिल्या नाही. आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी यासाठी 2 मेला हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

जळगावमधील प्रेमविवाहानंतर झालेल्या हत्याकांडाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. जातीच्या बाहेर जाऊन लग्न करणाऱ्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलं आणि कुटुंबाने हिंसा केली तर त्यापासून संरक्षण सरकारने दिले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here