शासकीय रुग्णालयातील ‘थ्री टी एमआरआय’ मशीनचे लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) –
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी ‘थ्री टी एमआरआय मशीन’ या अत्याधुनिक उपकरणाचे लोकार्पण ३ मेरोजी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थापनेनंतर ८ वर्षांमध्ये क्ष किरण विभागांमध्ये आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅनसोबत थ्री टेस्ला एमआरआय मशीनची देखील सुविधा रुग्णांना उपलब्ध झाली आहे. यासाठी सरकारी शुल्क नियमानुसार राहणार आहे.
सुरुवातीला केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ही सुविधा सुरू राहील. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एमआरआयची सुविधा ओपीडी तत्त्वावर रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येईल. क्ष किरण विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआरआय विभागात तंत्रज्ञ सेवा देणार आहेत. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ईडब्लूएस योजनेअंतर्गत २०२३-२४ ला मंजूर निधीतून थ्री टेसला एमआरआय मशीन खरेदी करण्यात आले.