पुणे : प्रतिनिधी
विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सानिज वर्ल्ड, पुणे येथे ५७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सांघिक गटाने सुरुवात झाली.त्यापूर्वी सकाळी सानिज वर्ल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सनी निम्हण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला,सचिव नंदू सोनावणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निकाल : पुरुष सांघिक गट
सातारा विजयी वि. धुळे ३-०, मुंबई विजयी वि. पालघर
३-०, जळगाव विजयी वि. कोल्हापूर २- १.
महिला सांघिक गट : मुंबई विजयी वि. ठाणे ३-०, सिंधुदुर्ग विजयी वि. रत्नागिरी २-१, पुणे विजयी वि. ठाणे २-१.
या स्पर्धेत सी ग्रुपमधे रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,जळगाव हे
चार संघ होते.जळगाव जिल्ह्याचे नवोदित कॅरम खेळाडू अय्यूब खान , मुस्तुफा शेख व रईस शेख यांनी नईम अन्सारीसह जोरदार प्रदर्शन केले.रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर या तीनही संघांचा जळगाव जिल्ह्याने पराभव करून सी गटात प्रथम स्थान प्राप्त करून उपउपान्त्य फेरीमध्ये प्रवेश केला.त्यानंतर मुंबई उपनगर संघासोबत अतिशय चुरशीच्या सामन्यात जळगाव संघालला पराभव पत्कारावा लागला.या संघाला मंजूर खान यांचे मार्गदर्शन लाभले.