हार्दिकच्या अनुपस्थितीत रोहित नव्हे तर कोण असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?

0
50

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावापूर्वी गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात ट्रेड होऊन पुन्हा दाखल झाला. हार्दिकचे आगमन होताच मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले मात्र, सध्या हार्दिकच्या फिटनेसबाबत अनेक बातम्या येत आहेत. हार्दिक पांड्याला वर्ल्ड कप २०२३ मध्ये दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप बरा होऊ शकलेला नाही. आता काही रिपोर्ट्च्या मते, हार्दिक कदाचित आयपीएल २०२४ पर्यंत तंदुरुस्त नसेल आणि संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही.
काही रिपोर्ट्सच्या मते, पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आगामी अफगाणिस्तान टी-२० मालिका तसेच आयपीएल २०२४ चा भाग असणार आहे मात्र, आता प्रश्न पडतो की, जर भारतीय अष्टपैलू खेळाडू वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर आयपीएल २०२४ मध्ये एमआयचे नेतृत्व कोण करू शकेल? अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे हार्दिकच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्त्व करू शकतात.

जसप्रीत बुमराह
हार्दिकच्या अनुपस्थितीत भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील मुंबई इंडियनचा कर्णधार होऊ शकतो.त्याने अनेक वेळा टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे. तो २०२३ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.त्याने आयपीएलमध्ये १२० सामन्यात १४५ विकेट घेतल्या आहेत.

इशान किशन
मुंबई इंडियन्सचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन हा देखील या आयपीएलमधील फ्रँचायझीशी दीर्घकाळापासून जोडला गेला आहे. इशानने त्याच्या अंडर १९ दिवसांमध्ये कर्णधारपदही भूषवले आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सला युवा आणि आक्रमक कर्णधार हवा असेल तर त्यांच्याकडे इशानपेक्षा चांगला पर्याय नाही.

सूर्यकुमार यादव
टी-२० मधील अव्वल आणि मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा देखील कर्णधारपदासाठी चांगला पर्याय आहे. त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. त्याने आपल्या कर्णधार कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here