अवैध गौण खनिज प्रकरण: १३७ कोटी दंडाची नोटीस, खडसे म्हणाले हे राजकीय षढयंत्र

0
16

जळगाव : प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैधरीत्या गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. यात माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग आहे. १३७ कोटी रुपये दंडासंदर्भात नोटिशीवर अपील करणार आहे. मी सत्तेच्या विरोधात नेहमी बोलतो. आताही भाजपची सत्ता आहे. मी महसूलमंत्री असताना त्यावेळची प्रकरणे ते काढत आहेत. ईडी चौकशीतूनही काही त्यांच्या हाती लागले नाही. तसाच हा एक राजकीय षडयंत्राचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना तब्बल १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपये दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, खडसे परिवाराच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली असून, तेथून राष्ट्रीय महामार्गासाठी ४०० कोटींचे गौण खनिजाचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याअनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीची ग्वाही दिल्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पथकाच्या अहवालानंतर मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली. त्यात आमदार खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचाही त्यात समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here