मलकापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण २०२४ ला मदत केल्यास भारत देश हा जगातील महासत्ता देश होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मलकापूर येथे आयोजित जनसंवाद यात्रेप्रसंगी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत रेशन वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भाजपाच्यावतीने पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले तर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ३७.५ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना मिळाले. ४.७ लाख कोटी रुपयांचे कर्ज प्रधानमंत्री कृषी संचाई योजनेअंतर्गत ५७ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला. अशा विविध प्रकारचा लाभ गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना मोदींंनी मिळवून दिला आहे.
कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच २२ जानेवारीला जगातील सर्वात मोठी दीपावली आहे. राम जन्मभूमी सोहळा होणार असून याठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचीही सुविधा देण्यात येणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
यावेळी महाविजय २०२४ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात संपर्क असे समर्थन ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन निमवाडी चौक येथे केले होते. यावेळी ना.गिरीश महाजन, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा.रक्षा खडसे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार चैनसुख संचेती, विजय चौधरी, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उमा तायडे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिवचंद्र तायडे, अमोल जावळे, अशोक कांडेलकर, माजी नगराध्यक्ष विजयराव जाधव, जि. प. सदस्य राजेश ऐकडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे जे पाठक, रवीभाऊ अनासपुरे, नंदूभाऊ महाजन, मोहन शर्मा, डॉ. योगेश पाटनी, प्रदेश सचिव शिवराज जाधव, युवक जिल्हाध्यक्ष यश संचेती, शंकर पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोदे, रामभाऊ झांबरे, संजय काजळे, अर्चना शुक्ला, अश्विनी शाम पाटील, अश्विनी देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर पाटील, मिलिंद डवले, बबलू देशमुख, नांदुरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जनसंवाद यात्रेद्वारे जनतेशी संवाद साधण्यात आला.