Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नशिबात असेल तर येईल पुन्हा निवडून
    जळगाव

    नशिबात असेल तर येईल पुन्हा निवडून

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ , मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
    मंत्री पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत असतो. तथापि, आपण हे कार्य मतांसाठी करत असल्याची टीका विरोधकांकडून होते. तथापि, आपण मतांसाठी कुठलेही काम करत नाही. धर्मा करत असतो. समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल, नसेल तर येणार नाही. तथापि, मी माझे कार्य करत आहे आणि ते मरेपर्यंत करत राहणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
    ज्यांनी हिंदुत्व टिकवले, संप्रदाय टिकवला, असे अनेक कीर्तनकार, संप्रदायाचे लोक आजही भाड्याच्या घरात राहतात, ही आपल्या राज्याची स्थिती असून ती खेदाची बाब आहे, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मात्र, राज्यात काय होईल हे माहीत नाही, पण जळगाव जिल्ह्यात आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील, असा आश्वासने यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : आदर्श पुरस्काराने सन्मानित: वैशाली झाल्टे – समाजसेवेतील प्रेरणादायी महिला

    March 13, 2026

    Jalgaon:अश्लील व्हिडिओच्या धमकीने तरुणीचा विनयभंग नराधमाला पोलिसांची अटक

    March 13, 2026

    Savda: सावदा शहरातील ‘भारत गादी भंडार’ला भीषण आग तब्बल ३ लाखांचे नुकसान

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.