मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावर सोमवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी वारंवार शरद पवारांनी हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवला. २०२२ मधील पक्षांच्या नियुया नियमबाह्य पद्धतीने केल्या, असा युक्तिवाद केला. यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला, असे आम्ही बोललोच नाही, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला. मनमानी करत नियमबाह्य पद्धतीने नियुया केल्या, या वकिलांच्या युक्तिवादाबाबत विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी कांँग्रेसची (अजित पवार गट) भूमिका वकिलांकडे कळवली आहे.नीरज किशन कौल हे आमची भूमिका मांडत आहेत.
निवडणूक आयोगासमोर त्यांनी युक्तिवाद केला होता. त्यांनी काय युक्तिवाद करावा? हा त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे मात्र आम्हाला जे म्हणणं मांडायचं होतं. ते आम्ही वकिलांमार्फत मांडले आहे. त्यांनी जो युक्तिवाद केला, तो त्यांचा अधिकार आहे पण आम्ही तसे काही बोललो नाही. शरद पवारांबद्दल आमच्या मनात नितांत आदर होता. आजही आहे आणि भविष्यातही कायम राहील.
हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवल्याचे तुम्हाला कधी जाणवलं का? असे विचारले असता आमदार मिटकरी पुढे म्हणाले, “मी सुरुवातीपासून समांंगत आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संविधानिक पक्ष आहे. या पक्षामध्ये कुणी हुकुमशाही पद्धतीने वागले, असे मला तरी जाणवले नाही. त्यामुळे हा पक्ष केवळ पक्ष नसून आम्ही त्याला परिवार म्हणतो. वकिलांचा युक्तिवाद हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. आम्ही आमची भूमिका त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडली आहे.