जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीड़ा दिन व राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सॉफ्टफुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, सोलापुर शहर व जिल्हा बेसबॉल असो. व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुर जिल्ह्यातील क्रीड़ा क्षेत्रातील 93 विविध क्रीड़ा संघटना आणि 28 क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर नामवंत शैक्षणिक संस्था व 14 क्रीडा क्षेत्रातील निवृत्त मान्यवरांचा व क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
हा सोहळा माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षेतेखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष विनोद भोसले, जिल्हा व राष्ट्रीय संघटनेचे सचिव प्रा. संतोष खेंडे सर आदींच्या उपस्थितीत सोलापूर येथील फड़कुले सभागृहात झाला.