पाळधी प्रतिनिधी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जीपीएस शैक्षणिक परिवारातर्फे आज दिनांक 19 -2- 2022 रोजी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रतापरावजी पाटील,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी.डी. कंखरे सर,इंग्लिश मीडियम चे प्रिंसिपल श्री सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर, माध्यमिक विद्यालयाचे श्री आर. व्ही.पाटील सर, श्री श्याम पाटील सर, सौं. वाघोदे मॅडम, यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन सौं.आरती पाटील मॅडम यांनी केले. प्रा.मोनिका पाटील यांनी पावनखिंडीच्या प्रसंगावर कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.प्रा.भूषण पाटील सरानी आजच्या काळात शिव विचाराचे महत्त्व मांडले. स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर प्रतिमा फलकावर कला शिक्षिका सौ.प्रीती पाटील मॅडम यांनी रेखाटली. आभार प्रदर्शन श्री. राकेश धनगर सरानी केले.कार्यक्रमाच्या वेळी GPS परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमात कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.