Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»अर्थ»gold : जळगावात सोने तोळ्यामागे २३६९ रुपयांनी उतरले
    अर्थ

    gold : जळगावात सोने तोळ्यामागे २३६९ रुपयांनी उतरले

    Vikas PatilBy Vikas PatilApril 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात सोने तोळ्यामागे २३६९ रुपयांनी उतरले

    जळगाव (प्रतिनिधी)-

    लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश ग्राहकांना बुधवारी सकाळी दिलासा मिळाला. शहरात मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडताच २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत घसरले.

    जळगावमध्ये गुढीपाडव्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेली घसरण पुढील काही दिवस कायम राहिल्याने सोने ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, नऊ एप्रिलला पुन्हा उसळी घेतलेल्या सोन्याचे दर प्रतितोळा ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दरवाढीत सातत्य राहिल्याने २२ एप्रिलपर्यंत सोन्याचे दर उच्चांकी प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत स्थिरावले.

    गेल्या १४ दिवसात तब्बल १० हजार ५०६ रुपयांनी सोने वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक अवाक झाले होते. अक्षय्य तृतियेच्या सणापूर्वीच सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालत असताना, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. दोन आठवड्यांपासून उच्च पातळीवर असलेल्या सोने दरात मोठी घट नोंदविण्यात आल्यानंतर विशेषतः सुवर्ण व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कारण, उच्चांकी दरवाढीनंतर सराफ बाजारातील सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ठप्प झाले होते. दरातील घसरण एका दिवसापुरतीच राहते की अक्षय्य तृतियेपर्यंत त्यात सातत्य राहते, याकडे आता ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.