Gang of shooting suspects : गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयितांची टोळी पकडली

0
51

गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयितांची टोळी पकडली

जळगाव( प्रतिनिधी)

शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात रामानंदनगर पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

महेंद्र सपकाळे (वय २०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे मार्केट येथे आला होते. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने आरोपींनी कोयते आणि गावठी कट्ट्यासह येऊन फिर्यादीवर गोळीबार केला. या गोळीबारात महेंद्र सपकाळे यांच्या कमरेखाली गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता.

तपास करताना पोलिसांनी काही दिवसात सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल कोळी (पिस्तूलासह), अक्षय धोबी, धिरज कोळी, सागर भोई, नितेश जाधव आणि गिरिष घुगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी गिरिष घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसांचे खोल व एक कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपींचा मागील रेकॉर्ड तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी विशाल कोळी याच्यावर जळगाव शहर आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. आरोपी अक्षय धोबी याच्यावर ८ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आरोपी नितेश जाधव याच्याविरुद्ध १५ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ , सपोनि संदीप वाघ, पोउपनि प्रदिप बोरुडे आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here