जलद ४ हजार धावा करणारा गायकवाड हा जगातील संयुक्त चौथा खेळाडू

0
8

रायपूर : वृत्तसंस्था

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले आहे. चौथ्या टी-२० सामन्यात ऋतुराजला मोठी खेळी साकारत आली नसली तरीही त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडने विशेष कामगिरी केली आहे.त्याने त्याच्या या कामगिरीसह दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
ऋतुराज गायकवाड हा २० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी, गायकवाडला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ४ हजारचा आकडा गाठण्यासाठी सात धावांची गरज होती, ज्यामुळे त्याने ही खास कामगिरी केली आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर डावाची सुरुवात करताना ऋतुराज गायकवाडने एकूण २८ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो ११४.२८ च्या स्ट्राइक रेटने ३२ धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकार आला.
२६ वर्षीय ऋतुराज गायकवाडने ११६ व्या डावात ४ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या आधी संघाचा सध्याचा अनुभवी फलंदाज केएल राहुलच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. त्याने ११७ डावात टी-२० मध्ये ४ हजार धावांचा टप्पा गाठला. टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. किंग कोहलने १३८ डावात टी-२० फॉरमॅटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा गाठला.
इतकंच नाही तर टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ४ हजारधावा करणारा गायकवाड हा जगातील संयुक्त चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेही चौथ्या स्थानावर आहे. त्याने ११६ डावात हा विशेष आकडा गाठला होता.
वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. गेलने १०७ डावात ४ हजार धावांचा टप्पा गाठला होता. त्याच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श (११३) दुस-या स्थानावर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम (११५) तिस-या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here