अज्ञात वाहनाच्या धडकेत माजी सरपंच ठार; घातपाताचा संशय
चाळीसगाव (प्रतिनिधी )-
चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाजपचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला. या संशयावरून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
प्रकाश पाटील दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. नातेवाईकांनी आणि समर्थकांनी हा घातपात असू शकतो, अशी शक्यता वर्तवली या वादामुळे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण बनले.
तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी प्रकाश पाटील यांच्या दुचाकीला धडक देणारे वाहन जप्त केले चालकाला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली चालकाची चौकशी केली जात आहे.
प्रकाश पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली.