माजी खासदार निलेश राणेंचा राजकारणाला रामराम

0
43

सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था

भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणात आता मन रमत नाही, असे सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले आहे. एक्स या समाजमाध्यमातून याबाबतची पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे.
निलेश राणे यांनी पोस्टवर म्हटले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्यासोबत राहिलात,त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. “मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here