डुबलिन : वृत्तसंस्था
भारतीय संघ काही दिवसांत आयर्लंडच्या दौऱ्यासाठी सज्ज होणार आहे.या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-२० सामन्यांनी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी जसप्रीत बुमराची निवड करण्यात आली आहे. आता भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी आयर्लंडच्या संघाची निवड करण्यात आली आहे.
आयर्लंडने १५ खेळाडूंचा संघ काल जाहीर केला. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून नियोजित तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु होणार आहे. या आयर्लंडच्या संघात प्रामुख्याने अशा खेळाडूंचा समावेश आहे जे गेल्या महिन्यात यशस्वी विश्वचषक पात्रता मोहिमेचा भाग होते पण लीन्स्टर लाइटनिंग आणि अष्टपैलू फिओन हँडला संघात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.जूनमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या मनगटाच्या दुखापतीतून बरे झालेल्या गॅरेथ डेलनीचे पुनरागमन आयर्लंडच्या संघासाठी महत्वाचे असेल.
?आयर्लंडचा संघ असा:पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्य्रू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.
भारत-आयर्लंड दौऱ्यातील सामने
१८ ऑगस्ट : पहिला सामना
२० ऑगस्ट : दुसरा सामना
२३ ऑगस्ट : तिसरा सामना
(सर्व सामन्यांची स्थानिक वेळ-दुपारी ३ वाजता)