रावेर आगारात नव्या पाच बसेस दाखल
रावेर (प्रतिनिधी )-
रावेर बस आगाराला आता नव्याने पाच बसगाड्या मिळाल्या आहेत. या नवीन बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा रावेर येथील एस.टी. बस स्थानकाच्या प्रांगणात पार पडला. या नवीन गाड्यांमुळे दूरच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
याप्रसंगी भाजपाचे सुरेश धनके यांनी सांगितले की, आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांमुळे नवीन बसगाड्या आगारात दाखल झाल्या आहेत. लवकरच आणखी काही नवीन बसगाड्या आगारात दाखल होणार असल्याची आशा व्यक्त केली.
माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी रावेर आगारातून थेट रायगडसाठी बससेवा सुरू करण्याची सूचना अधिकाऱ्यांकडे मांडली. रायगडला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, ही सेवा सुरू झाल्यास त्यांना फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
या सोहळ्याला तहसीलदार बंडू कापसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, दुर्गेश पाटील, राजन लासुरकर, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, नितीन पाटील, वासुदेव नरवाडे, उमेश महाजन, बाळा आमोदकर, मनोज श्रावग, चेतन पाटील, रविंद्र महाजन, रजनीकांत बारी, आगार प्रमुख इम्रान पठाण, संदीप अडकमोल, विश्वजित तेली उपस्थित होते.