खामगाव ते शेगाव मार्गावर अपघातात पाच ठार ; सहा गंभीर जखमी

0
46

खामगाव ते शेगाव मार्गावर अपघातात पाच ठार ; सहा गंभीर जखमी

बुलडाणा (प्रतिनिधी)

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत २५ जण जखमी झाले असून सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे.

खामगाव ते शेगाव दरम्यान जयपूर लांडे फाटासमोर हा अपघात झाला पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून चार चाकी वाहनाने आधी धडक दिली, नंतर खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले.. सकाळी पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..

२४ जखमींना खामगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

पहाटे अपघात झाल्यानंतर आवाज झाला, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here