आधी खोट्या नावाने मुलीशी मैत्री, नंतर धमकावत संबंधांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी)-
नाव बदलून मुलीशी मैत्री आणि तिचे अश्लील फोटो काढून संबंधांची मागणी करणाऱ्या आयान शे. नूर मोहम्मद (वय 19 वर्षे, रा.शिवाजीनगर रोड, गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध पीडित मुलीने तक्रार केली. या आरोपीला अटक करण्यात आली न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी नूर मोहम्मद याने फिर्यादीच्या बालमनाचा फायदा घेत तिच्याशी गोड बोलून आधी विशाल शर्मा असे नाव सांगून फिर्यादीशी मैत्री केली. नंतर 22 डिसेंबर 2024 रोजी व 2025 मधील जानेवारीमध्ये शहरातील हनुमान मंदिराजवळ तिच्या मनाविरुध्द फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
नंतर 26 मार्चरोजी शहरातील बहीणाबाई गार्डनमध्ये पीडित मुलीच्या लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला व तिच्याकडे संबंधांची मागणी करुन आई वडीलांना व तिला मारुन टाकण्याची धमकी दिली.
आरोपी आयान शे. नूर मोहम्मद (वय 19 वर्षे, रा.शिवाजीनगर रोड, गेंदालाल मिल) यास 28 रोजी अटक करण्यात आली. आरोपीला न्या. एस आर झवर-भागडिया यांनी 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे.



