पुर्ववैमनस्यातून मारहाणीत तरूणासह वडील, काकाही गंभीर जखमी
भडगाव ( प्रतिनिधी ) –
तालुक्यातील वाक येथे तरुणाला जुन्या वादातून तलवारीने मारहाणीत त्याच्या मानेला जखम झाली व डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली आहे. कुटुंबीय मदतीसाठी धावले असता त्याचे वडील व काका यांनाही मारहाण करण्यात आली. भडगाव पोलीस स्टेशनला संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश पाटील (वय २८, रा. वाक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री गावातील योगेश पाटील, उमेश पाटील, सतिष पाटील, अक्षय पाटील हे इंडिका व्हिस्टा गाडी क्रमांक (एम. एच.४२ ए यु ४२४९)ने आले. वाहन योगेश चालवत होता. योगेश याने फिर्यादी राकेश पाटील याला ठोस मारली. वाहनातून वरील चारही इसम खाली उतरले. उमेश पाटील याने धरुन ठेवले व योगेश पाटील याने वाहनांतून तलवार काढली फिर्यादीच्या मानेवर उगारली. तलवारीचा वार फिर्यादी राकेश पाटील यांच्या मानेच्या डावे बाजुस लागला. पुन्हा तलवार तलवारीचा वार राकेश पाटील यांच्या मनगटास लागला.
फिर्यादीचे काका किशोर पाटील व वडील सुधाकर पाटील हे सोडविण्यास आले असता योगेश पाटील याने तलवारीने किशोर पाटील यांच्या डोक्यावर वार केला. उमेश पाटील याने हातात लाकडी दांडकाने मारहाण केली. सतिष पाटील व अक्षय पाटील यांनी उमेश याचे हातातील लाकडी दांडका घेवून वडीलांना व काकांना मारहाण केली होती.
नंतर तेथे फिर्यादीचे दुसरे काका सर्जेराव पाटील, आई लिलाबाई पाटील, काकू जागृती पाटील, परमेस्वर पाटील यांनी मारहाण करणा-या लोकांच्या तावडीतून सोडवले. ग्रामीण रुग्णालय येथे आणत असतांना संशयित आरोपींनी त्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. योगेश पाटील, उमेश पाटील, सतिष पाटील, अक्षय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.