Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Explosion in firecracker factory : फटाका कारखान्यात स्फोट : गोविंद शिरोळेiसह कुटुंबातील तिघांना दहा वर्षांची शिक्षा
    क्राईम

    Explosion in firecracker factory : फटाका कारखान्यात स्फोट : गोविंद शिरोळेiसह कुटुंबातील तिघांना दहा वर्षांची शिक्षा

    Vikas PatilBy Vikas PatilApril 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फटाका कारखान्यात स्फोट : गोविंद शिरोळेiसह कुटुंबातील तिघांना दहा वर्षांची शिक्षा

    पारोळा (प्रतिनिधी )

    फटाका कारखान्यात स्फोट होऊन २४ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या खटल्यात माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे.

    पारोळा येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन होरपळून २४ कामगारांचा मृत्यू झाला होता. १० एप्रिल २००९ रोजी ही भीषण घटना घडली होती. कारखान्याचे मालक तथा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे व त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    अमळनेर न्यायालयात हा खटला चालला होता. ४२ पैकी ३८ साक्षीदार फितूर झाले होते. या खटल्याचा काल निकाल लागला. यात गोविंद शिरोळे, त्यांचा ङाऊ चंद्रकांत शिरोळे आणि मनीषा शिरोळे या तिघांना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य सहा संशयितांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

    पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. सहा बालके, नऊ महिला आणि नऊ पुरुष अशा २४ जणांचा बळी गेला होता ४४ जण जखमी झाले होते.

    न्या. छाया पाटील यांनी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ. योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून फॅक्टरी मालक गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे व मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच स्फोटक कायदा कलम २ (ब) प्रमाणे २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा आणि अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.