साईमत जळगाव प्रतिनिधी
सारांश फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजुमामा भोळे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल कोल्हे, सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे , उपाध्यक्षा इंदू मोरे , संजय इंगळे आदीउपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी , राजर्षी शाहू , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलू इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व आभार प्रदर्शन सोनली पवार यांनी केले .
भारतीय सैन्य दलात सेवा देऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांच्याप्रति व सामाजिक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत असलेल्या उत्कृष्ट समाजकार्य केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . सत्कारार्थी सुभेदार शिवाजी शिंदे, सुभेदार सुनील गायकवाड , सुभेदार श्रीकृष्ण खराटे , सुभेदार बापू बडगुजर , बीएसएफ चे सब इन्स्पेक्टर विद्याधर पाटिल , शिपाई समाधान बोरसे , नाईक अशोक चव्हाण , आतंकवादी चकमकीत शाहिद झालेले सीआरपीएफ चे कॉन्स्टेबल शेख उस्मान पिंजारी यांच्या पत्नी फरीदा बी शेख उस्मान , एमएसईबी तील सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव पवार , धरणगावच्या माजी नगराध्यक्षा अंजली विसावे , समांतर विधी सहाय्यक शिलांबरी जमदाडे , सामाजिक कार्यकर्त्या नीता सांगोळे , माँ शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई अंभोरे , पोलीस कॉन्स्टेबल रंजना बत्तीसे व उज्वला पातोंडे , मुस्लिम सेवा संघाच्या फिरोजा शेख यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारांश फाऊंडेशनच्या सचिव चंदा इंगळे, विद्या झनके, संगीता पगारे, सुमन इंगळे, सिंधु शेगोकर, अजय इंगळे यांनी परिश्रम घेतले.