उध्दव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदी निवडीच्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिली असल्याचा पुरावा

0
4

मुंबई : प्रतिनिधी

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर त्यांचा फैसला सुनावला. दोन्ही गटांना त्यांनी पात्र ठरवले पण एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल, उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी झालेली निवड यावर प्रश्न उपस्थित केले. याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा ठाकरे गटाने खोडून काढला आहे.
२०१३ मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आले.त्या पदावर ठाकरेंची निवड झाली. याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. पक्षाच्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली.त्याची पोचपावतीदेखील आपल्याकडे आहे, असं ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले. आयोगाचा शिक्का असलेली प्रतदेखील त्यांनी दाखवली.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनीदेखील काही कागदपत्रं आणि फोटो समोर आणले आहेत. २०१३ मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. तेव्हा राहुल नार्वेकर तिथेच उपस्थित होते एकतर्फी निकाल देताना त्यांना कदाचित याचा विसर पडाला असावा, अशी टीका सावंत यांनी केली. २०१३ मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. त्यानंतर आम्ही २०१४ ची लोकसभा निवडणूक सोबत लढलो. नंतर झालेली विधानसभा निवडणूक वेगळी लढलो,असे सावंत यांनी सांगितले.
२०१३ मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाली त्यात माझे नाव नव्हते असे नार्वेकर म्हणाले पण सत्य वेगळे आहे.माझ्याकडे २०१३ च्या राष्ट्रीय कार्यकारणीची यादी आहे त्यात उपनेत्यांच्या यादीत माझे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.तु्‌‍‍म्ही १९९९ पर्यंत मागे जाता पण तुम्हाला २०१३ पर्यंत जाता येत नाही. नार्वेकरांनी निकाल दिला, पण न्याय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही निर्देश दिले होते. त्याचे सर्रास उल्लंघन त्यांनी केले. ही बाब गंभीर आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here