वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार
जळगाव (प्रतिनिधी)-
महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे.
राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे. राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याच्या घोषणा केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याची घोषणा केली होती.