Electricity bills
इंधन समायोजन शुल्काच्या बोजाने वीज बिल वाढणार
जळगाव (प्रतिनिधी)-
राज्यात १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार होती. मात्र, महावितरणने आक्षेप घेतल्याने राज्य नियामक आयोगाने निर्णय स्थगित ठेवला. या स्थगितीमुळे ग्राहकांना पुढील आदेशापर्यंत सध्या सुरू असलेल्या दरानेच वीज बिल येणार आहे. महावितरणने घरगुती ग्राहकांवर आता इंधन समायोजन शुल्क लावल्याने विजेचे बिल वाढून येणार आहेत
वर्गवारीनुसार, व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी १५ ते ३० पैसे, पथदिवे ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे अधिक इंधन शुल्क म्हणून द्यावे लागतील.