विधानसभा उपाध्यक्षांची निवड २६ मार्चला
मुंबई (प्रतिनिधी)-
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी २५ मार्चरोजी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २६ मार्चरोजी उपाध्यक्षाची निवड होणार आहे.
विधानपरिषदेचे सभापतीपद भाजपच्या तर उपसभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे आता महायुतीत विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून विधानसभा उपाध्यक्षपद कुणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.