Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावात ‘ईद पाडवा’; सामाजिक एकतेचा जागर
    जळगाव

    जळगावात ‘ईद पाडवा’; सामाजिक एकतेचा जागर

    Vikas PatilBy Vikas PatilApril 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात ‘ईद पाडवा’; सामाजिक एकतेचा जागर

    जळगाव ( प्रतिनिधी )-

    गुढी पाडवा आणि ईद या दोन सणांनिमित्त शहरात सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा ‘ईद पाडवा’ सोहळा साजरा झाला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सौहार्द आणि शांततेचा संदेश दिला.

    कट्टर हिंदूत्व, कट्टर इस्लाम मनात बाळगताना कट्टर देशभक्ती देखील असावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी यावेळी केले. प्रत्येकाने आपल्या धर्म, जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्याचा अपमान होईल असे कृत्य करू नये. अगोदर बॅनर, पोस्टरमुळे वाद व्हायचे आता सोशल मीडियामुळे होतात. एकाने काही पोस्ट केली तर दुसरा त्याला उत्तर देतो आणि त्यातून वाद वाढतो. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे , असे ते म्हणाले.

    गुढी पाडवा आणि ईद एकाच वेळी साजरा करून जळगावकरांनी सामाजिक एकतेचा दृष्टांत घडवला. शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

    बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादीचे एजाज मलिक, सोहेल अमीर, डॉ. विवेक जोशी, माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, अँड. पियुष पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, मानसिंग सोनवणे, डॉ. रागीब अहमद, माजी नगरसेवक जाकीर पठाण, अश्फाक मिर्झा, अयाज अली, अमजद पठाण, निलेश तायडे, शाहिद शेख, संजय वराडे, युवराज सोनवणे आदी उपस्थित होते.

    सोहळा यशस्वी करण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे चेतन वाणी, वसीम खान, इमरान खान, अझर खान, हरीश मलीक, फिरोज शेख, फहीम खान, जावेद शेख, इस्माईल खान, इसरार खान, शोएब शेख, नझर खान, तस्लिम सय्यद, जकी अहमद, रिजवान सैय्यद, वसीम शेख, अयाज मोहसीन, आनंद गोरे, बबलू खान, रहीम पेंटर, चंदन मोरे, राकेश वाणी, मोहन कासार आदींनी परिश्रम घेतले. चेतन वाणी यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले. आभार वसीम खान यांनी मानले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.