दुध संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणत्याही तडजोडी करणार नाही : मंगेश चव्हाण

0
24

जळगाव : प्रतिनिधी

मागील काळात तोट्यात गेलेल्या दुध संघाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणत्याही तडजोडी करणार नाही. असा इशारा जिल्हा दुध उत्पादक संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिला.मागील संंचालकांच्या कार्यकाळात दूध संघास झालेला तोटा गेल्या तीन महिन्यापासून भरून काढत असल्याचा दावा करीत भेसळयुक्त दुधाचा जर कोणी पुरवठा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा रविवारी घेण्यात आली.ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.या सभेच्या व्यासपिठावर ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन,जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,दुध संघाचे चेअरमन आ.मंगेश चव्हाण,जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार,माजी आमदार दिलीप वाघ,स्मिताताई वाघ,दिलीप निकम यांच्यासह सर्व संचालक होते.
या सभेनंतर चेअरमन मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.त्यात त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसोबत काही दूध उत्पादक संस्थांच्या ज्या तक्रारी असतील त्या आम्ही ऑनलाईनवक डेव्हलप करून सोडवणार आहेत. या माध्यामातून आलेल्या तक्रारी या विहित मुदतीत विहित वेळेत सोडविण्यात येतील,अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुध संघातीलदूधातील भेसळीचा प्रकार १०० टक्के थांबविण्यात आला आहे. बरेच दूध आम्ही तात्काळ परत करत आहोत. दूधातील भेसळ शोधण्यासाठी जवळपास ७८ लाखांची मशिन घेण्यात येईल. संचालकांची संस्था असली तरी आम्ही भेसळयुक्त दूध परत करत आहोत.्‌‍‍विकासचा चेअरमन म्हणूनच नव्हे तर एक आमदार म्हणून नागरिकांनी भेसळयुक्त दूधासंदर्भात आपणाकडे तक्रारी कराव्यात, आपण त्या सोडवू असे आवाहन चेअरमन मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.
दूध संघातील निवडणुकीबाबत बोलताना चेअरमन मंगेश चव्हाण म्हणाले की,खडसे हे सांगतात की ते स्वतः निवडून येत होते, मात्र ते हे सांगत नाही त्यांच्याकडे पात्र संस्था दोनच होत्या.एक त्यांची व दुसरी त्यांच्या मुलीची, बाकी कोणाचीच नाही.दुसरा कोणाचा फॉर्मच येत नव्हता. यामुळे मला मुक्ताईनगरातून लढावे लागले.निवडणुक निकोप लोकशाही पध्दतीने व्हावी या दृष्टीकोनातून आम्ही या संस्थेची खऱ्या अर्थाने प्रगती करत असल्याचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

तोट्यास मागील संंचालक जबाबदार
दूध संघात नवीन संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे संघास तोटा झाल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला होता. याला उत्तर देताना चेअरमन चव्हाण यांनी स्पष्ट केले की, एकनाथ खडसे हे खोटे बोलत आहेत. हा तोटा त्यांच्याच कार्यकाळातील असल्याचा आरोप त्यांनी केला. चेअरमन चव्हाण यांनी पुढे सांगितले की, मी तीन महिन्यांपासून दूध संघात चेअरमन झालो आहे.या काळात दूध संघाला ८ कोटी ४९ लाख ११ हजार रूपयांचा नफा झाला, तो खडसे यांच्या कार्यकाळातील तोट भरण्यात गेला. हा तोटा आमच्या कार्यकाळातील नाही, अशी भूमिका मांडली. खडसे यांच्या कार्यकाळातील तोट्याचे खड्डे भरून आम्ही दूध संघाची प्रगती करू असे स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here