30 thousand surgeries : डॉ. नि. तु. पाटील यांचा ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

0
7

डॉ. नि. तु. पाटील यांचा ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम

जळगाव (प्रतिनिधी)-

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांनी ३० हजार यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम केला आहे. भुसावळसारख्या शहरात त्यांनी हे यश संपादन केले आहे.

डॉ. पाटील यांनी सांगितले की, त्यांनी एमबीबीएसनंतर डीओएमएस केले. पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया २००५ मध्ये झाली. नंतर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सेवा दिली. जे.जे. रुग्णालयात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यभरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या अनुभवातून कौशल्ये आत्मसात केली. जळगावमध्ये नेत्रज्योती हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटलमध्येही नेत्रसेवा दिली. १ मे २०११ रोजी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात रुजू झाल्यावर रावेर लोकसभा मतदारसंघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान यशस्वीपणे चालवले. याच प्रयत्नांमुळे रुग्णांचा विश्वास वाढत गेला आणि ३० हजार शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

डॉ. पाटील यांनी एका डोळा निकामी झालेल्या आणि दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या ६०० रुग्णांना दृष्टी प्रदान केली आहे. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान असते, पण डॉ. पाटील यांनी ते लीलया पेलले आहे. ते दररोज पहाटे ४ वाजता शस्त्रक्रिया सुरू करतात.

डॉ. पाटील नेत्ररोग आहेतच, त्यांनी वैद्यकीय शिक्षणासोबतच कायद्याची पदवी, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये प्रथम क्रमांक, पत्रकारिता आणि इतर विषयात प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या नावावर ११ पदव्या आहेत. ते नर्मदा परिक्रमा करणारे एकमेव नेत्रतज्ज्ञ आहेत, डॉ. नि.तु. पाटील हे डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयाएवढ्या शस्त्रक्रिया करून त्यांचे अनोखे अभिष्टचिंतन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here