Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Dr. Aniket Patil’s success : डॉ. अनिकेत पाटील यांचे एमसीएच न्युरोसर्जरीत यश 
    जळगाव

    Dr. Aniket Patil’s success : डॉ. अनिकेत पाटील यांचे एमसीएच न्युरोसर्जरीत यश 

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डॉ. अनिकेत पाटील यांचे एमसीएच न्युरोसर्जरीत यश 

    जळगाव (प्रतिनिधी)-

    गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च एमसीएच न्युरोसर्जरीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय जगात नव्या, कुशल न्युरोसर्जनची भर पडली आहे.

    डॉ. अनिकेत पाटील यांनी शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी पुण्यातील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि जनरल सर्जरीमध्ये एम एस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथे त्यांनी न्युरोसर्जरीमध्ये एमसीएचची पदवी पूर्ण केली. हे यश त्यांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि वैद्यकीय क्षेत्राप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर मिळवले आहे.

    डॉ. अनिकेत पाटील यांनी आई-वडिलांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. ते लवकरच न्युरोसर्जन म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. मेंदू आणि मणक्याच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आशेचा किरण मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, उत्कृष्ट कौशल्ये आणि रुग्णांप्रति संवेदनशील दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या आधारे डॉ. अनिकेत पाटील रुग्णसेवेला नवीन दिशा देतील, यात शंका नाही.

    डॉ. अनिकेत यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या वतीने श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अक्षता पाटील यांच्यासह गोदावरी परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.