जळगाव : प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मनपास्तरीय आंतर शालेय हॉकी क्रिडा स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलला दुहेरी मुकुट प्राप्त झाले.
जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षातील मुलांच्या व मूलींच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूलने विजेते पद पटकवले. १४ वर्ष मुलांच्या गटात अंतिम सामना गोदावरी स्कूलने अँग्लो उर्दू हायस्कूलला १-० गोल ने पराभूत केले तसेच मूलींचे गटात अंतिम सामना गोदावरी स्कूलने पोदार इंटरनैशनल स्कूलला १-०गोल करुण पराभूत केले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्या डॉ केतकी पाटील, डॉ वैभव पाटील व प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले. गोदावरीचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.आसिफ खान, पंकज तिवारी व ममता शर्मा यांचे खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.