Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे सरकारला ट्रकभर पुरावे द्यायचे का?
    राज्य

    मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे सरकारला ट्रकभर पुरावे द्यायचे का?

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धाराशिव : वृत्तसंस्था

    मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांंगे पाटील यांनी धाराशीवमध्ये “मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत,” असा दावा केला आहे तसेच सरकारला ५ हजार कागदपत्रे सापडली आहेत. आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही केला.
    ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) धाराशीवमध्ये बोलत होते.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आयोगाचे सदस्य सनाट गेले आणि म्हटले कुणबी नोंदीची ५ हजार कागदपत्र सापडले.आता कागदपत्र कसे सापडले.आता आमचं कसं ठरलं होतं ते सांगतो. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार द्यावा लागतो. त्याशिवाय कायदा पारित होत नाही. जर आधार दिला तर त्या कायद्याला आव्हान देण्याची हिंमत कुणातही नसते.
    आता मराठा आणि कुणबी एकच असल्याचा ५ हजार पानांचा आधार मिळाला आहे. आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे. यांना नेमका किती आधार पाहिजे हे त्यांनी आम्हाला एकदाचे सांगावे. यांना ५ हजार पानांचा आधार मिळाला आहे, आता काय यांना ट्रकभर पुरावे द्यायचे का. त्यामुळे त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत याचे माझ्याकडे पुरावे आहेत. या कागदावरही सरकारला आरक्षण देता येते, असे मत मनोज जरांगेंनी व्यक्त केले.

    माझ्यावर आरोप केला तर सोडतच नाही
    छगन भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले “मी स्वत: आधी टीका करत नाही. मी उगीच कुणावर कधी आरोप करत नाही. समोरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केला तर मी त्याला सोडतच नाही.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.