जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा उद्या शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी)-
सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा शुभारंभ १ मे रोजी सकाळी करण्यात येणार आहे. उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सामाजिक न्याय भवन, येथून कार्यान्वित होणार असून दिव्यांग व्यक्तींना एकत्रित सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून जिल्हा दिव्याग सक्षमीकरण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता सोपविण्यात आला आहे.
जळगाव जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माधुरी भागवत यांच्याकडे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
या कार्यालयाच्या स्थापनेमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, पुनर्वसन व अन्य सवलतींचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. विविध यंत्रणा आणि समाजकल्याण विभागाच्या समन्वयातून दिव्यांगांसाठी सेवा सुलभ केल्या जाणार आहेत.