जिल्ह्यातील १० पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह
जळगाव (प्रतिनिधी) –
उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्ह्यातील १० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही घोषणा केली.
पोलिस दलात उत्तम कामगिरीबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्य पदकानंतर ही घोषणा केली जाते. सन २०२४ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदकाची यादी जाहीर झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील १० जण आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक शामकांत पाटील, जगन्नाथ पाटील, हवालदार रमेश कुमावत, हरिश कोळी, जितेंद्र पाटील, गोरखनाथ बागुल, विनोद पाटील, दिलीप कुलकर्णी, आशिष चौधरी व पोलिस शिपाई जागृती काळे यांचा समावेश आहे.