संतोष देशमु्ख हत्याकांडात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे म्हणजे आहेच – मनोज जरांगे
बीड (प्रतिनिधी)-
संतोष देशमु्ख हत्याकांडात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे म्हणजे आहेच. त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करा. एका चिल्लर कामासाठी चांगल्या लेकराचा खून केला याचे वाईट वाटते. एक नंबरच्या आरोपीने हे करायला लावले हे इतरांनी कबूल केले आहे. आता यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहीजे”, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि सरकारवर जोरदार टीका केली.
पुढे ते म्हणाले की, वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. हे सगळे लोक धनंजय मुंडेंचे असून यात त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे हा महत्वाचा विषय आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडेंना फुलस्टॉप द्यायचे काम केले ते करायला नको होते. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचे काम केले