११ मुलं आणि ३४ नातवंडं असतानाही ९५ वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न

0
33

इस्लामाबाद ः वृत्तसंस्था

पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे कारण आधीच ६ मुले आणि ५ मुलींचा बाप असणाऱ्या या व्यक्तीचे वय तब्बल ९५ वर्षं आहे. मोहम्मद झकारिया असे या व्यक्तीचे नाव असून २०११ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची नातवंडं आणि नातवंडांची मुले पकडून एकूण ९० जण आहेत पण यानंतरही त्यांना दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे, त्यांच्या लेकानेच त्यांचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

उत्तर- पश्चिम पाकिस्तानच्या मानसेहरा  शहरात राहणारे जकारिया यांनी पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर १२ वर्षांनी दुसरे लग्न केले आहे. मोहम्मद झकारिया यांच्या लग्नाला त्यांची ११ मुलं आणि ३४ नातवंड, पणतू उपस्थित होते.मोहम्मद झकारिया यांच्या पहिल्या पत्नीचे २०११ मध्ये निधन झाले होते. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लग्न करत नवा साथादीर हवा असल्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यासाठी मुलीचा शोध घेतला जात होता.

पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिल आहे.  त्यात दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मानसेहरा येथील वयस्कर व्यक्ती मोहम्मद झकारिया यांना ६ मुलं आणि ५ मुली आहेत. याशिवाय त्यांची नातवंडं आणि पणतू यांची संख्या पाहिली तर ती ९० पेक्षा जास्त आहे.

झकारिया यांना दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्यांच्या अनेक मुलांनी विरोध केला पण त्यांचा लहान मुलगा वकार तनोलीने मात्र त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये पत्नीचे प्रेम मिळाले पाहिजे असे वकारला वाटत होते त्यामुळे त्याने आपल्या वडिलांसाठी जोडीदार शोधण्याचा निर्णय घेतला.

एका वृत्तानुसार, चांगले आरोग्य आणि संतुलित आयुष्य घालवत असल्याने मोहम्मद झकारिया प्रसिध्द असून, संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे ते निरोगी आयुष्य जगत आहेत. ते सांगतात की, त्यांनी कधीच शेतातील गोष्टींचे थेट सेवन केले नाही. कधीच ते थंड पाणी प्यायले नाहीत.शिळ्या अन्नालाही त्यांनी कधी हात लावला नाही.

कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

मोहम्मद झकारिया यांना निकाह स्थानिक मौलवी मौलाना गुलाम मुर्तजा यांनी एका कार्यक्रमात लावला. या निकाहला कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली. अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात कुटुंबातील सदस्य तसंच नातेवाईक आणि पाहुण्यांनी हजेरी लावली.९५ वर्षीय मोहम्मद झकारिया यांची पत्नी सराय आलमगीर येथील असल्याची माहिती आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here