भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार
यावल (प्रतिनिधी)–
पाण्याच्या शोधात शहरात शिरलेल्या हरणाला कुत्र्यांनी लचके तोडत ठार केल्याची घटना शनिवारी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळाचा पंचनामा करून हरणाचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फैजपूर ते सावदा रस्त्यावरील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात हरीण मृत अवस्थेत आढळून आले. या हरणाच्या मागे भटक्या कुत्र्यांचे टोळके लागले होते. या कुत्र्यांनी हरणचा लचका तोडला आणि त्यात या मादी हरणीचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी वनपाल सतीश वाघमारे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पाठवले.