Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता ना, म्हणत मुंबईकर पतीला फसवून दीपिका पळाली कुवेतला
    राष्ट्रीय

    तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता ना, म्हणत मुंबईकर पतीला फसवून दीपिका पळाली कुवेतला

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जयपूर : वृत्तसंस्था

    प्रेमासाठी भारतात आलेली सीमा हैदर आणि प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू या दोघीजणी सध्या चर्चेत असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील एक महिला तिच्या दोन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत कुवेतला पळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. महत्त्वाचं म्हणजे, या महिलेचा पती मुंबईत नोकरीनिमित्त राहत होता. याप्रकरणी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
    हे प्रकरण राजस्थानच्या डूंगरपुर जिल्ह्यातील आहे. दीपिका पाटीदार नावाची 35 वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसोबत गावात राहत होती. मुलगी 11 वर्षांची असून मुलगा 7 वर्षांचा आहे. तर, पती नोकरीनिमित्त मुंबईत राहतो. दीपिका तिच्या उपचारांसाठी सतत गुजरात आणि उदयपूरला जात होती. परंतु, 10 जुलै रोजी ती गुजरातला गेली ती परत आलीच नाही. तसंच, तिचा आता बुरख्यातील एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
    मुबंई नोकरीनिमित्त राहणाऱ्या मुकेश पाटीदार याला तिने व्हॉट्‌‍सॲप कॉल केला होता. तिने फोन करून सांगितलं की तुम्ही माझ्यामुळे सतत दुःखी असता ना. त्यामुळे मी तुमच्यापासून लांब राहत आहे. असं ती फोनवर बोलली. यामुळे घाबरलेल्या पतीने तत्काळ राजस्थानमधील घर गाठले. परंतु, दीपिका तिथे नव्हती. त्याच्या घरातील दागिनेही जागेवर नव्हते. घरातून रोख रक्कमही गायब झाली होती. त्यामुळे पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.दीपिकाच्या पतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पोलिसांना दुसराच अँगल समोर आला आहे. दीपिकाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तिने बुरखा घातलेला आहे. इरफान हैदर नावाच्या व्यक्तीसोबत ती पळून गेली असून तो गुजरातच्या हिम्मतनगर येथे राहणार आहे. तर, हे दोघेही आता कुवेत येथे असल्याचंही सांगण्यात येतंय.
    दीपिकाचं ब्रेनवॉशिंग करण्यात आल्याचा दावा मुकेशने पत्रकारांसमोर केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.