जरांगे-भुजबळ संघर्षावर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांचे तोंडावर बोट!

0
6

बुलढाणा : प्रतिनिधी

मी सध्या बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंंत्री या नात्याने विकास योजनांचा आढावा घेत आहे.यामुळे राज्यात काही सुरू आहे,याची मला फारशी कल्पना नाही.यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्षावर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही मला वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका,अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली.
बुलढाण्याचे पालकमंत्री वळसे पाटील दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत.या व्यस्ततेत माध्यमाशी बोलताना त्यांनी मराठाविरुद्ध ओबीसी संघर्ष,मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील शाब्दिक संघर्ष, या वादग्रस्त विषयांवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मी दोन दिवसांपासून आढावा बैठकांत व्यस्त आहे. त्यामुळे या घडामोडींबद्दल अनभिज्ञ आहे आणि तसेही तुम्ही मला या वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका, असे त्यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या भावना
वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार
जिल्ह्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या भावना आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह कोअर समितीपर्यंत पोहोचवणार आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०५ कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ देण्यास राज्य बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे. आमदार राजेंद्र शिंगणे यासाठी प्रयत्नशील आहेत. मीदेखील यात लक्ष घातले असून सरकार व राज्य सहकारी बँकेच्या संपर्कात असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here