नांदेड : वृत्तसंस्था
येथील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत १६ नवजात बालकांसह ३१ रुग्ण दगावले आहेत. घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकाची एक समिती चौकशी नांदेडला दाखल झाली आहे. डॉ.भारत चव्हाण, डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ञ डॉ.जोशी यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन पाहणी केली.
विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ पर्यंत गेली आहे.