बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
मुंबई (प्रतिनिधी)-
इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार (५ मे रोजी) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.
कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी- http://hscresult.mkcl.org , http://hscresult.mkcl.org , STORIES YOU MAY LIKE , mahahssboard.in , Results.targetpublications.org , Results.navneet.com
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.
विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळकाडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन किंवा स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. ६ ते २० मे या कालावधीत हे अर्ज करता येतील.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – mahresult.nic.in , “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा , आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका, “Submit” वर क्लिक करा , निकाल स्क्रीनवर दिसेल – त्याची PDF डाउनलोड करा.
SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा.
दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळते. वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे निकाल लवकर समजत नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त होतात. पण आता वेबसाइटवर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.