Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Bogus teacher recruitment : बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक, अधिकारी म्हणतात, ‘तो मी नव्हेच’, बँक खाती गोठवली 
    जळगाव

    Bogus teacher recruitment : बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक, अधिकारी म्हणतात, ‘तो मी नव्हेच’, बँक खाती गोठवली 

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक, अधिकारी म्हणतात, ‘तो मी नव्हेच’, बँक खाती गोठवली 

    नाशिक ( प्रतिनिधी ) –

    शिक्षक भरतीत बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. गोपनीय पद्धतीने होत असलेल्या चौकशीत एका माजी शिक्षण अधिकाऱ्याने ‘त्या’ स्वाक्षऱ्या केल्याच नाहीत, असा दावा केल्याने चौकशीची व्याप्ती वाढली आहे. काही शिक्षक, कर्मचाऱ्यांचे बँक खातेही गोठविण्यात आले असून, सोमवारी जुन्या संचमान्यता शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    बोगस शालार्थ आयडी काढून फसवणूक केल्याने शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी ७९ शिक्षक, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार नागपूरला उघड झाल्यानंतर राज्यभर तपासणी सुरू झाली.

    संस्था चालक आणि शिक्षणाधिकारी अशी साखळी असल्याने चौकशीत राजकीय दबाव तंत्रही वापरले जाते आहे. नाशिकमधील आणखी प्रकरणे उघड होणार, अशी चर्चा सुरू असतानाच काही आजी-माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याचे समजते. मात्र, त्यात काय नोंदविण्यात आले हे गुलदस्त्यात आहे.

    शिक्षक कर्मचाऱ्यांची चूक नसताना त्यांची फसवणूक होत आहे. कर्मचाऱ्यांना व शिक्षण विभागातील काही प्रामाणिक अधिकारी व संस्था चालकांना फसविण्यासाठी बनावट स्वाक्षरीची कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांना फसविण्यात आले आहे. याची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असल्याचे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी सांगितले.

    वेतन काढणाऱ्या कर्मचाऱ्याची चूक नसताना त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक हे निवृत्त होण्याच्या आधीच पदे भरून ठेवली जातात. ते शिक्षक हजर नसतानाही मागील तारखा दाखविण्यात येतात.
    शिक्षण विभागात सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मागील वर्षाच्या बोगस सह्यांचे प्रकारदेखील या तपासणीत दिसून येत असून ज्या प्रकरणांची नोंद आवक-जावक रजिस्टरमध्ये नाही, अशी प्रकरणे आमच्या माथी मारली जात असल्याचा आरोप मुख्याध्यापकांकडून होत आहे.

    नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चारही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरतीचे नागपूर कनेक्शन ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले होते. आता प्रथमच शिक्षण विभागाने चौकशीचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडे संच मान्यतेचे जुने रेकॉर्ड सादर करायचे आहे. त्यानंतर ते उपसंचालक कार्यालयामार्फत शिक्षण विभागाकडे जातील.

    शालार्थ आयडी जनरेट झाल्याची तारीख व वेळ या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी नोंदविण्यात यावी. शाळांच्या मागील वर्षातील यू-डायस प्लस, शिक्षक कर्मचारी नोंदणी रजिस्टर, मस्टर, रुजू रिपोर्ट, स्कूल रिपोर्टमधील संख्या, शाळेचा वार्षिक तपासणी अहवाल, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी हजेरी रजिस्टर, मयत कर्मचाऱ्यांचा अहवाल, दैनिक अभिलेख तपासण्यात यावे.

    २०१२ पासूनची बिंदुनामावली, सेवानिवृत शिक्षक व नवीन पद, नवीन शिक्षक यातील तफावत, पद निर्मिती, विनाअनुदानित मान्यता देण्याचे पुरावे तपासावेत, अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : जळगावात ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरवर चोरी

    January 21, 2026

    जळगावमध्ये “सकल लेवा पाटीदार युवती व महिला अधिवेशन” होणार; समाजाच्या नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध

    January 21, 2026

    Parola : वारसा हक्क डावलून आई-विरुद्ध सख्ख्या भावांनी मालमत्ता बळकावली

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.