भाजपकडून मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’

0
14

भाजपकडून मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’

मुंबई ( प्रतिनिधी )-

रमजान ईदसाठी भाजपने मुस्लिम बांधवांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप अल्पसंख्याक मोर्चाने देशातील 32 लाख गरीब मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ किट देण्याची घोषणा केली आहे.

ईद साजरी करताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. रमजानच्या पवित्र महिन्यात गरजू शेजाऱ्यांना मदत करण्याचा परंपरेला चालना देत भाजपने मुस्लिम समाजासाठी हे पाऊल उचलले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीपूर्वी मुस्लिम समाजात आपली स्वीकारार्हता वाढवण्यासाठी भाजपकडून अभियान राबवले जात आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे 32 हजार पदाधिकारी देशभरातील 3 हजार मशिदींमध्ये भेट देऊन 32 लाख गरजू मुस्लिमांना मदत करतील. दिल्लीतील निजामुद्दीन येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

‘सौगात-ए-मोदी’ किटमध्ये ईदसाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश असेल. यात शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप-डालडा आणि महिलांसाठी सूट फॅब्रिकचा समावेश असेल. इतर काही आवश्यक वस्तूही या किटमध्ये दिल्या जाणार आहेत. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजासाठी मदतकार्य राबवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी इफ्तार पार्टीत सहभागी होऊन सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात, अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here