Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी भरत गोगावले यांचे देवीकडे मागणं
    राजकीय

    मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी भरत गोगावले यांचे देवीकडे मागणं

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना आवडेल, अशा शब्दात मनसे-शिवसेना संभाव्य युतीवर आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केले. त्याचवेळी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी, असे देवीकडे साकडे घातल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले.
    शिवसेना नेते आमदार भरतशेठ गोगावले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबियांसह अंबाबाई देवीच्या दर्शनाला कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन मनोभावे पूजा केली. गोगावले यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधीही झाला. दर्शनानंतर गोगावले यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधला.

    शिंदे-राज ठाकरे
    एकत्र येणार का?
    मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढलेली जवळीक पाहता, येत्या काळात दोन्ही पक्षांमध्ये काही राजकीय समीकरणे जुळून युती-आघाडी होईल का? असा प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडला आहे. हाच प्रश्न गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येत असेल तर आनंदच होईल, ही चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.

    गोगावले मंत्रिपदावर
    काय म्हणाले?
    आई अंबाबाई चरणी प्रार्थना केली आहे. तीन वेळा आमदार झालो आहे, आता विजयी चौकारसुद्धा मारावा. शिवाय आता अपुरी मंत्रिपदाची इच्छासुद्धा पूर्ण व्हावी असे साकडं देवीला घातल्याचे गोगावले यांनी सांगितलं. त्याचवेळी या महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात माझं नाव असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    ज्यांनी घोटाळे केले आणि आरोप सोमय्यांनी केले त्यावर, त्यांनाच प्रश्न विचारला तर बरं होईल.. घोटाळे आणि आरोप ते दोघांनाच माहिती, आम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नाही.आम्ही काहीही केलेले नाहीये.त्यांनी काहीही बोलावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे गोगावले म्हणाले. त्याचवेळी सिंधुदुर्गमधील पाणबुडीचा प्रोजेक्ट कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितल्याचेही गोगावले म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.